E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुण्यातील तपमान ४३ अंशांवर
Wrutuja pandharpure
10 Apr 2025
पुणे
: पुणे शहर आणि परिसरात कमाल तपमानात सातत्याने वाढ होत आहे. शहरात बुधवारी तपमान वाढीचा विक्रम झाला. एप्रिल महिन्यातील सर्वाधिक ४३ अंश कमाल तपमानाची नोंद लोहगावात झाली. हे या हंगामातील सर्वाधिक तपमान असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. आजही (गुरूवारी) वाढलेले तपमान स्थिर राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
लोहगावात मंगळवारी ४२.७ अंश कमाल तपमानाची नोंद झाली होती. काल त्यात वाढ होऊन ४३ अंशांवर पोहोचले. यासोबतच, शहर आणि उपनगराती कमाल तपमानाने चाळीशीचा टप्पा ओलांडला. वाढलेल्या तपमानामुळे घराबाहेर पडताना पुणेकरांना विचार करावा लागत आहे. काल दुपारी रस्त्यांवरील वाहने आणि नागरिकांच्या संख्येत मोठी घट झाली होती. सकाळी दहापासूनच उन्हाचे चटके जाणवत होते. उष्ण व दमट वातावरणामुळे उकाडा वाढला होता. दुपारी त्यात अधिकच भर पडली. येत्या १५ एप्रिलपर्यंत अशीच परिस्थती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
त्यामुळे पुणेकरांना ऊन आणि उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. या काळात बहुतांश ठिकाणी कमाल तपमान ४० अंशावर असणार आहे. दरम्यान, एक कमी दाबाचा पट्टा पश्चिम राजस्तानपासून वायव्य विदर्भापर्यंत जात आहे. मागील २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात हवामान कोरडे होते. पुढील दोन दिवस राज्याच्या विविध भागात पावसाचा अंदाज आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अमरावती या जिल्ह्यात आज (गुरूवारी) उष्ण व दमट वातावरण असणार आहे. रात्रीचे तपमान सरासरीपेक्षा अधिक असणार आहे. राज्यात चार दिवसांनतर मात्र हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज आहे.
अकोल्यात विक्रमी तपमान
विदर्भातील अकोला जिल्ह्यात सलग दुसर्या दिवशी विक्रमी ४४.१ अंश किमान तपमानाची नोंद झाली. विदर्भात बहुतांश जिल्ह्यातील कमाल तपमानाने ४० अंशाचा पारा ओलांडला आहे. विदर्भात मागील चार दिवसांपासून वाढलेल्या तपमानामुळे सूर्य अक्षरशः आग ओकत आहे. आणखी दोन दिवस विदर्भात वाढलेले तपमान कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे दुपारी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
कमाल व किमान तपमान
लोहगाव
४३ अंश
३६ अंश
शिवाजीनगर
४१ अंश
२४.६ अंश
पाषाण
४१ अंश
२३.३ अंश
कोरेगाव पार्क
४१ अंश
२६.४ अंश
मगरपट्टा
४० अंश
२६.५ अंश
एनडीए
३९ अंश
२२.३ अंश
Related
Articles
श्रेयस अय्यरला आयसीसीकडून सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार
16 Apr 2025
वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जगाच्या नकाशावर
17 Apr 2025
दबंग दिल्लीकडून दिया चितळेला सर्वोच्च बोली
17 Apr 2025
स्लोव्हाकियात ‘एक झाड आईसाठी’ उपक्रम राबविणार
12 Apr 2025
बॉक्सिंग असोसिएशनच्या कारभाराची चौकशी व्हावी : एजाज हुसेन
17 Apr 2025
कैद्यांना मिळते आहार विषयक परंपरेनुसार जेवण
11 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
तहव्वुर राणाला घेऊन NIA पथक दिल्लीत दाखल